उदयनराजे, आठ दिवस थांबा... : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत भडकलेल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सोमवारी पुणे जिल्हा ठरला. सकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची भेट घेतली. या घडामोडी समजताच उदयनराजेंनी पवारांची वेळ घेतली. त्यानुसार सायंकाळी मोदीबाग येथील पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली. उदयनराजेंनी आपली बाजू मांडली. त्यावर आठ दिवस थांबा, त्यानंतर आपण सर्वांशी चर्चा करून मार्ग काढू, असे पवारांनी सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना पुन्हा उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी आज पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे उघडपणे विरोध नोंदवला. या घडमोडी घडताच खासदार उदयनराजे भोसले यांनी पवार यांची त्यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी भेट घेतली. सातारा येथील उमेदवारीच्या प्रश्‍नावर पुढील आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे पवार यांनी सांगितल्याचे समजते. 

काल गणपती विसर्जन असल्याने थंडावलेला हा वाद आज पुन्हा पेटला. रामराजेंच्या नेतृत्वाखाली सर्व उदयनराजे विरोधक आमदार बारामती येथील गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी त्यांना भेटले. सर्वांनी उदयनराजे सोडून दुसरा उमेदवार द्या, त्याला निवडून आणतो, अशी एकमुखी मागणी केली. त्यानंतर रामराजे स्वत: पवारांच्या गाडीत बसून पुण्यापर्यंत आले. त्यानंतर सायंकाळी मोदीबाग येथील पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन उदयनराजेंनी आपली बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com