'स्वच्छ' शहरांत वाहनांचा धूर! 

'स्वच्छ' शहरांत वाहनांचा धूर! 

पुणे क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषणकारी वाहने; कोल्हापूर दुसरे, ठाणे तिसरे 

मुंबई - देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर शहरांनी स्थान मिळवले असले, तरी राज्यातील प्रदूषणकारी वाहनांच्या यादीतही या शहरांचा वरचा क्रमांक लागतो. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या अहवालात पुणे क्षेत्राने (पुणे, सोलापूर, पिंपरी, चिंचवड, बारामती, अकलूज) प्रदूषणकारी वाहनांच्या यादीत पहिला क्रमांकावर आहे.

यात कोल्हापूर (कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड) दुसऱ्या, ठाणे तिसऱ्या (ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई) तर पनवेल क्षेत्र (पनवेल, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी) चौथ्या क्रमांकावर आहे. 

2016-17 मध्ये प्रदूषणकारी वाहनांवर पुण्यात 11,959 वाहनांवर, तर कोल्हापूर क्षेत्रात 11,543 वाहनांवर कारवाई झाली. राज्यात एकूण 75,255 प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई करण्यात आली. कार्बन मोनॉक्‍साइडचे प्रमाण 300 पेक्षा जास्त असेल तर ते वाहन प्रदूषणकारी ठरते. अशा वाहनांना पीयूसी (पोल्यूशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र गरजेचे असते, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाते. वाहन नवीन असेल तर वर्षभरात आणि वाहन जुने असेल तर सहा महिन्यांत "पीयूसी' आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र चालकाकडे नसेल, तर ते सात दिवसांत आरटीओकडे सादर करणे बंधनकारक आहे. पीयूसी असूनही वाहन प्रदूषणकारी असल्याचे लक्षात आल्यास संबंधित चालकाला एक हजाराचा दंड केला जातो. ते वाहन दुरुस्त होईपर्यंत त्याची नोंदणी निलंबित केली जाते. 

प्रदूषणकारी वाहनांवर आतापर्यंत झालेल्या तीन कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला. आरटीओच्या मोबाईल पीयूसी सेंटरकडून म्हणजेच फिरत्या पथकाकडूनही कारवाई केली जाते. 

प्रदूषणकारी वाहने 

क्षेत्र - वाहने 

पुणे - 11959 
कोल्हापूर - 11,543 
ठाणे - 9631 
पनवेल - 8950 
नागपूर (ग्रामीण) - 6109 
नाशिक - 4952 
मुंबई - 4622 
अमरावती - 4078 
धुळे - 3544 
लातूर - 3485 
नागपूर - 2886 
नांदेड - 1766 
औरंगाबाद - 1730 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com