विधान परिषदचे कामकाज ठप्पच

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - कर्जमाफीच्या मागणीवर विरोधी सदस्य ठाम असल्याने आजही विधान परिषदेचे कामकाज ठप्प राहिले. विधान परिषदेतील कोंडी फुटावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून काय भूमिका घेतली जातेय याकडे विरोधकांचे लक्ष आहे.

उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सभागृहात प्रवेश करताच कालचाच कित्ता गिरवत विरोधी बाकावरील सदस्यांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे उपसभापती ठाकरे यांनी, अशा गोंधळात सभागृहाचे कामकाज चालवणे अशक्‍य असल्याचे सांगत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दोन मिनिटांत सभागृह तहकूब झाल्यामुळे तारांकीत प्रश्नोत्तरेही पटलावर मांडता आली नाहीत.

Web Title: vidhan parishad work stop