गर्भपातापूर्वी भूल देणारा विजयकुमारच 

गर्भपातापूर्वी भूल देणारा विजयकुमारच 

सांगली : गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यापूर्वी भूल देणारा हा विजयकुमार चौगुलेच असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान, गर्भपाताची संख्या नऊवरून पंधरावर गेली आहे. तर कुटुंब नियोजनाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्याचेही उघड झाले आहे. 17 महिलांचे जबाब आज नोंदविण्यात आले. 

चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचा अड्डा उघडकीस आल्यानंतर मुख्य संशयित डॉ. रूपाली आणि तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीत गर्भपातापूर्वी विजयकुमारच भूल देत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या तपासणीत औषधसाठ्यासह संशयास्पद कागदपत्रे हाती लागली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या दोघांचेही जबाब आज नोंदविण्यात आले. या प्रकरणातील डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप पसार असून, त्याचा शोध घेतला जात असल्याचे उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले. 

गर्भपात करण्यात आलेल्या केसेस प्रामुख्याने सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य संशयित रूपाली आणि तिचा पती विजयुकमार तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com