hacker
hacker

#ViralSatya 'हा' मेसेज ओपन केला तर होईल फोन हॅक

'इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत.पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा', असा मेसेज तुम्हाला आला आहे का? अशा आशयाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहे. असे मेसेज पाठवून हॅकर्स तुमचा फोन हॅक करत आहेत. 

पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा विचार न केलेला बरा. स्मार्टफोनमधील डेटा हॅक करुन फसवणूकीचे प्रकार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. आता हॅकर्सनी नवीन पद्धत शोधून काढलीय.

सध्या अनेक जणांना आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचे खोटे मेसेज येत आहेत. लोकांना गंडा घालण्यासाठी अशाप्रकारे पैशाचं आमिष दाखवलं जातंय. त्यामुळं तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आल्याचा मेसेज आला तर सावधान. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो. 

फसवणूक करण्याच्या नवीन पद्धती हॅकर्सनं शोधून काढल्या आहेत. कुणालाही शंका येणार नाही अशी फसवणूक हॅकर्स करतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कधी फोन करून, तर कधी पैशाचं आमिष दाखवून डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स युक्त्या करतायत. आता तर लोकांना पैशाचं आमिष दाखवून फसवायला सुरूवात केलीय. या आमिषाला अनेकजण बळी पडतायत.

या मेसेजवरील लिंक ओपन केली तर आपल्या मोबाईलमधील किंवा कंप्युटरमधील डाटा हॅक होऊ शकतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पैसे खात्यात जमा झाल्याचा कोणताही मेसेज पाठवला जात नाही हे, त्यामुळे अशा ई-मेल किंवा मेसेजवरची लिंक ओपन करू नका..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com