राज्यात 164 जागांसाठी आज मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील 164 नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (ता. 27) मतदान आहे.

त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असून, सदस्यपदांच्या 3 हजार 705 व थेट नगराध्यक्षपदांच्या 147 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मतदारांची एकूण संख्या 58 लाख 49 हजार 171 इतकी असून, त्यासाठी 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे; दरम्यान, आचारसंहितेच्या काळात 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 रुपयांची रोकड आणि 1 लाख 24 हजार 336 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. 

सहारिया यांनी सांगितले, की जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 25 जिल्ह्यांमधील 147 नगर परिषदा व 18 नगरपंचायतींसाठी (एकूण 165) उद्या मतदान होणार होते; परंतु शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता 17 नगरपंचायतींसाठी मतदान होईल. तसेच विविध ठिकाणी 28 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यामुळे सदस्यपदाच्या 3 हजार 705जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. त्यासाठी 15 हजार 826 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगर परिषदेच्या 147 थेट नगराध्यक्षपदांसाठी 1 हजार 13 उमेदवारांमध्ये लढत होईल. या सर्व ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 28 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणांची आचारसंहिता संपुष्टात येईल. 

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी पुरेशा बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असतील. आवश्‍यकतेनुसार राज्य राखीव दलाच्या तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पुरेशी काळजी घेतली जाणार आहे. या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच पोलिसांनी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. या कालावधीत पोलिसांनी विविध 41 प्रकरणांमध्ये 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 रुपयांची रोकड जप्त केली आहे. 2 हजार 520 प्रकरणांमध्ये 1 लाख 24 हजार 336 लिटर अवैध मद्यही जप्त केले आहे. त्याचबरोबर संशयित व्यक्तींविरुद्ध कार्यवाही, प्रतिबंधात्मक उपाय, नाकाबंदी इत्यादी उपाययोजनाही केल्या आहेत, असेही सहारिया यांनी सांगितले. 

ठळक आकडे 

  • एकूण प्रभाग- 1,967 
  • सदस्यपदांच्या जागा- 3,705 
  • थेट नगराध्यक्षपदांच्या जागा- 147 
  • एकूण मतदान केंद्रे- 7,641
  • एकूण मतदार- 58,49,171 
  • सदस्यपदांसाठी उमेदवार- 15,826 
  • बिनविरोध विजयी सदस्य- 28 
  • थेट नगराध्यक्षपदांसाठीचे उमेदवार- 1,013 
  • मतमोजणी- 28 नोव्हेंबर 2016
Web Title: Voting for 164 constituencies for Nagar Parishad in Maharashtra today