वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला आव्हान देण्याचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई -  खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांवर लादलेल्या निर्बंधांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा विनाअनुदानित खासगी आणि दंत महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी सोमवारी (ता. 10) येथे दिला. 

भारतीय वैद्यक परिषदेच्या परिपत्रकानुसार देशभरातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेन्स टेस्ट (नीट) आणि कॉमन ऍडमिशन प्रोसेस (कॅप)द्वारे राबवण्यात येणार आहे. खासगी महाविद्यालयांतील प्रवेशांमध्ये हस्तक्षेप कशाला, असा प्रश्न विचारत भारतीय वैद्यकीय परिषदेचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सरसकट उल्लंघन असल्याचा आरोप कमलकिशोर कदम यांनी केला आहे. खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया संबंधित महाविद्यालयानेच राबवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका निकालात दिले होते, असा दावा कदम यांनी केला. आम्हाला विद्यार्थी निवडण्याचे आणि शुल्क आकारणीचे अधिकार आहेत. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असेल, तर न्यायालयात जाण्यावाचून पर्याय नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले.