कचरा, साथीचे थैमान यावर सभा गाजण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

डोंबिवली - डोंबिवलीत पहिल्यांदाच होणारी प्रभाग समित्यांची सभा कचरा, साथीच्या आजारांचे थैमान व रस्त्यावरील खड्डे या प्रश्‍नांवर गाजण्याची शक्‍यता आहे. 

डोंबिवली - डोंबिवलीत पहिल्यांदाच होणारी प्रभाग समित्यांची सभा कचरा, साथीच्या आजारांचे थैमान व रस्त्यावरील खड्डे या प्रश्‍नांवर गाजण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या हद्दीत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोणत्याही महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा मिळणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे शहरांतील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केडीएमसीला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र प्रभागा-प्रभागात भरत असलेल्या बाजारांमुळे कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यातूनच मंगळवारी (ता. 27) डोंबिवलीत होणाऱ्या प्रभाग समितीच्या सभेत हा प्रश्‍न गाजण्याची शक्‍यता आहे.
 

डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता "फ‘ प्रभाग क्षेत्र समिती आणि दुपारी दोन वाजता "ग‘ प्रभाग क्षेत्र समितीची सभा होणार आहे. "फ‘ प्रभाग क्षेत्र समितीत 12, तर "ग‘ प्रभाग क्षेत्र समितीत नऊ नगरसेवक आहेत. आयरे प्रभागातील आशीदेवी मंदिर ते मच्छी मार्केटपर्यंतच्या बाजारामुळे कचऱ्याचा प्रश्‍न वाढला आहे. येथील विजयनगर व ज्योतीनगर परिसरात मोकाट जणावरांची संख्या यावर प्रस्ताव सूचना "ग‘ प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत मांडला जाणार आहे. पालिकेने सर्व बाजार बंद केले असले, तरी आयरे येथील बाजार सुरू असल्याने कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.