"..अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होणार"

रशिया-युक्रेनच्या युद्धाने अख्ख जग चिंतेत असताना श्रीलंकेत महागाईने कहर केलाय
Sanjay Raut
Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेनच्या युद्धाने अख्ख जग चिंतेत असताना श्रीलंकेत महागाईने कहर केलाय. सध्या श्रीलंकाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले. पेट्रोल आणि डिझेलपासून ते दूध आणि इतर खाद्यपदार्थ इतके महाग झाले की लोकांना खरेदी करणे अशक्य झाले.अशात श्रीलंकेचे लोक रस्त्यावर उतरले. यावर जागतिक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी श्रीलंकेवर भाष्य करताना देशातील वाढत्या महागाईवर भाजपला टोला लगावलाय.

Sanjay Raut
ED ची मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता जप्त

संजय राऊत म्हणाले, “श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही आता त्या मार्गावर आहे. मात्र आता आपल्याला आपल्या देशातील परिस्थिती हाताळावी लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल.”

Sanjay Raut
"..अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होणार"

वाढत असलेल्या महागाईवर देशाच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या तीव्र विरोधानंतर अखेर श्रीलंका सरकारने आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतला. आणीबाणी घोषित करताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या आदेशात म्हटले, "आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला जात आहे."

Sanjay Raut
शिवसेनेचे १४ खासदार भाजपच्या संपर्कात, भाजप नेत्याचा दावा

श्रीलंकेची सद्यस्थिती पाहता श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेल संपले. मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करण्यासाठी देशाकडे पुरेसा पैसा शिल्लक नाही. डिझेलच्या टंचाईमुळे सर्वच मोठे वीजनिर्मिती केंद्र बंद पडले. दिवसातून १३ तास लोडशेडिंग होत असून विजेची स्थिती इतकी बिकट आहे की तेथील पथदिवेही बंद करण्यात आले. रुग्णालयांमध्ये विजेचा तुटवडा असल्याने डॉक्टरांना ऑपरेशन्स करता येत नाहीये. याशिवाय औषध आणि खाद्यपदार्थांसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. लोकांची सहनशक्ती संपली असून लोक दंगा करायला उतरले आहेत. लोक खाण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाहीये.

श्रीलंकेची लोकसंख्या केवळ 2.25 कोटी आहे. तर एका छोट्या देशात एवढा तुटवडा कसा निर्माण झाल्याने सरकार नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल पुरवण्यातही अपयशी ठरले. याउलट 140 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरुन संजय राऊत यांनी वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com