Amit Shaha
Amit Shaha

β मराठा मोर्चा- भाजप राजकीय संधी साधणार?

मराठा क्रांती मूक मोर्चामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या मोर्चाचे दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मोर्चात होणाऱ्या मागण्या, ज्या किमान तत्काळ मान्य करण्यासारख्या आहेत त्यांना हिरवा कंदील दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक गोष्टी साध्य करण्यासारख्या आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांना मोर्चाला घाबरू नका तर त्याकडे संधी म्हणून पहा असा कानमंत्र भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. हा मंत्र प्रत्यक्षात आणून कोट्यवधी मराठा बांधवांना दिलासा देत भाजपलाही फार मोठी झेप घेणे शक्‍य होणार आहे. 

कुठलाही नेता नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसतानाही लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चामध्ये सहभागी होत आहे. आतापर्यंतच्या सर्व मोर्चांना अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थादेखील हतबल झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने निघणाऱ्या या मूक मोर्चांना कसे सामोरे जावे हेच सत्ताधाऱ्यांना कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना काढण्याचे षडयंत्र यामागे असल्याचे काही कथित राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. स्वतः फडणवीस यांनीही एका मुलाखतीत त्यांना काढण्याचा प्रयत्न सफल होणार नाही असे वक्तव्य केले होते. परंतु, मोर्चातील कोणीही फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. किंबहुना विरोधी पक्षातील नेत्यांनीही तशी मागणी केलेली नाही. 

मोर्चातील मागण्या स्पष्ट आहेत. त्यामुळे त्या कशा प्रकार मान्य करता येतील यावर सारासार विचार करून प्रत्यक्षात कृती केल्यास त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो याची जाणीव झाल्यामुळेच राजकीय डावपेचात निपुण असलेल्या शहा यांनी फडणवीस यांचे कान टोचले असावेत. आता त्यानुसार मुख्यमंत्री काय हालचाली करतात यावर सारे काही अवलंबून आहे. 
मराठा समाजाचे राज्यात जे मोर्चे निघत आहेत त्यामुळे मराठा समाज एक झाला आहे. असे शांततामय मूक मोर्चा या आधी सबंध देशभरात कधी निघाले नव्हते. या मूक मोर्चातून व्यक्त होणारी भावना लक्षात घेताराजकीय व्यवस्थेने त्यावर तत्काळ उत्तर शोधण्याची वेळ आली आहे


मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांपासून दूर पळण्यापेक्षा त्या कशा मान्य करता येतील यावर खल करण्याची गरज आहे. मंत्रिमंडळात यावर चर्चा होणे आवश्‍यक आहे. मराठा मोर्चामुळे फार मोठी राजकीय व सामाजिक ‘स्पेस‘ निर्माण झाली आहे. त्यामुळे मोर्चांमधून करण्यात येत असलेल्या काही मागण्या जरी तत्काळ मान्य झाल्यास अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. त्या साध्य करण्यासाठीच कदाचित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना मोर्चाला संधी माना असे सांगितले आहे. ही संधी मुख्यमंत्री कशी साधतात त्यावर राज्याची पुढील दिशा ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com