स्मारकाला विरोध करणाऱ्यांशी चर्चा करणार: मेटे

सरकारनामा न्यूज ब्युरो
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या संघटनांबरोबर चर्चा करण्याची तयारी आमदार विनायक मेटे करणार आहेत. तसेच सोशल मीडियावरून होणारा विरोध लक्षात घेता नेटीझन्सच्या मनातील शंका दूर करण्यासाठी वेगळी यंत्रणाही उभारण्याचा विचार मेटे यांनी बोलून दाखविला.

मुंबई - अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या संघटनांबरोबर चर्चा करण्याची तयारी आमदार विनायक मेटे करणार आहेत. तसेच सोशल मीडियावरून होणारा विरोध लक्षात घेता नेटीझन्सच्या मनातील शंका दूर करण्यासाठी वेगळी यंत्रणाही उभारण्याचा विचार मेटे यांनी बोलून दाखविला.

स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध झुगारत सरकारने अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन केले. या भव्य स्मारकाचे स्वप्न साकारण्याकडे सरकारने एक पाऊल पुढे टाकल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात अनेक समस्या असताना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाला सोशल मिडीयावरुन मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

आघाडी सरकारने महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याबाबत निर्णय घेतला होता. आता सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने स्मारकाचे जलपूजन करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध करतानाच सरकारवर टीकाही केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाचे जलपूजन झाल्याने भाजपने राजकारण केल्याची टीका होऊ लागली आहे.तसेच सोशल मीडियावरही स्मारकाला विरोध होताना दिसत आहे. तसेच या स्मारकासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय मच्छीमारांनीही या स्मारकाच्या जागेला विरोध केला आहे. हा विरोध असतानाही स्मारकाच्या कामासाठी निविदा मागविली जाणार आहे.

याबाबत स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "स्मारकाच्या कामाची माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले जाणार आहे. तसेच सोशल मिडीयावरुन विचारल्या जाणाऱ्या विरोधी प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठीही वेगळी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. स्मारकाला विरोध करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्ग असल्याने महाविद्यालयांमध्ये जाऊन सरकारकडून स्मारकाची "सकारात्मक' बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

महाराष्ट्र

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन...

03.39 AM

मुंबई - रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभरातील...

03.03 AM

मुंबई - महागाई, तीन वर्षांतील विक्रमी पेट्रोल दरवाढ आणि घरगुती सिलिंडरची दरवाढ या प्रश्‍नांवर आवाज उठवत सत्ताधारी भाजपची कोंडी...

02.48 AM