पुणेकरांच्या घरी 'सकाळ' आणणाऱ्या महिलांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज (बुधवार) वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पुणे - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज (बुधवार) वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अगदी कालपर्यंत वृत्तपत्र विक्री या व्यवसायावर पुरुषांची मक्तेदारी होती किंवा हे पुरुषाचे काम आहे, असा समज होता. हा समज मोडीत काढत पुणे शहरात सध्या साधारण 150 महिला भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या कौतुकास्पद कामगिरीचा गौरव करण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी "सकाळ'चे वरिष्ठ उपव्यवस्थापक शैलेश पाटील, मुख्य व्यवस्थापक (वितरण) अब्दुल अजीज, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण निवंगुणे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आसावरी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संतोष कुंडे यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासंदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या कार्यक्रमासंदर्भातील फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Women newspaper distributors felicitation programme