'गेट वे'वर आज विश्वशांती परिषद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - भगवान गौतमबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी (ता.10) साजरी होणार आहे. यासाठी विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून 17 बौद्ध देशांचे राजदूत हजेरी लावणार आहेत. यानिमित्त काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी विश्व शांतता रॅली काढण्यात येईल.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्‌घाटन करणार आहेत.

सायंकाळी श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरिसेना तसेच थायलंडचे उच्चायुक्त एकापोल पोलपिपट भारतासोबतचे सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधीचे विचार मांडणार आहेत. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी आपले विचार मांडणार आहेत.