मुंबईच्या वाहतुकीची जागतिक बॅंकेला चिंता 

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक व नियोजन याची चिंता जागतिक बॅंकेला लागली असून, सिंगापूर आणि सेऊल या शहरांच्या धर्तीवर मुंबई व एमएमआरडीए प्रदेशातील शहरी वाहतूक व नियोजन यात अमूलाग्र बदल होण्यासाठी सुमारे वीस महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. 

मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक व नियोजन याची चिंता जागतिक बॅंकेला लागली असून, सिंगापूर आणि सेऊल या शहरांच्या धर्तीवर मुंबई व एमएमआरडीए प्रदेशातील शहरी वाहतूक व नियोजन यात अमूलाग्र बदल होण्यासाठी सुमारे वीस महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. 

जागतिक बॅंकेच्या वतीने सिंगापूर व सेऊल या शहरांचा अभ्यास; तसेच शिफारशी करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना पाचारण केले होते. सोबत वाहतूक व दळणवळण या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या जाणकारांचा समावेश आणि मार्गदर्शन होते. यातून मुंबई शहराच्या वाहतूक व नियोजनाबाबत अत्यंत मौलिक शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींपैकी बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या कामास नगरविकास लागला आहे. या विभागाने सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असून, हा विभाग इतर सर्व संबंधित विभागांशी बोलाचाली करत आहे. नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या शहरांना भेटी दिल्यानंतर तेथील नगर नियोजन, रस्ते, वाहतूक व्यवस्था, त्यातील अधुनिकता, विविध वाहतूक सेवा यांचा अभ्यास केला. 

नियोजनाबाबतच्या काही शिफारशी 
- पश्‍चिम रेल्वे, मध्य, हार्बर, बेस्ट, मेट्रो, टॅक्‍सी आदी सेवेसाठी एकच प्राधिकरण असावे 
- सर्व प्रकारच्या प्रवासी सेवेसाठी एकच भाडे कार्ड सुलभपणे वापरता येणे 
- महत्त्वाच्या रस्त्यांवर काही बसेससाठी स्पेशल लेन 
- दर दहा वर्षांनी खासगी वाहनांविषयी धोरण करून रस्त्यावरील वाहनांची मर्यादा ठरवणे 
- सहकारी सोसायट्या, मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटल आदींसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था विकसित करणे. 

Web Title: Worried to the World Bank of Mumbai Transport