यिनचे मंत्रिमंडळ विधान भवनात!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

विधिमंडळाच्या कामकाजाची घेतली माहिती
मुंबई : सकाळ माध्यम समूहाच्या "यंग इन्सपिरेटर्स नेटवर्कचे युवा मंत्री मंगळवारी (ता.29) विधान भवनात जाताच भारावून गेले. विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज व सभागृह कसे चालते, याबाबतची माहिती त्यांनी घेतली.

यिनच्या जिल्हा प्रमुखांच्या कार्यशाळेचा समारोप झाल्यानंतर युवा मंत्र्यांनी विधान भवनाला भेट दिली. विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांनी यिनच्या मंत्र्यांना विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहाची माहिती दिली. विधानसभेचे कामकाज, इतिहास व लोकशाही परंपरा याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली.

विधानसभेत घडलेल्या काही राजकीय नेत्यांमधील संसदीय चर्चा व त्यातून समृद्ध झालेली लोकशाहीची परंपरा याबाबत मदाने यांनी काही किस्से ही यिनच्या युवा मंत्र्यांना सांगितले.
वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही यिनच्या मंत्रिमंडळाशी मध्यवर्ती सभागृहात चर्चा केली. या वेळी त्यांनी भारतीय लोकशाही पद्धतीची माहिती घेतली.

यिनचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती सभागृहाच्या व्यासपीठावरून आपल्या भावना व्यक्‍त केल्या. विधान भवन गाठण्यासाठी आमदारांना अनेक प्रयत्न करावे लागतात; पण यिनच्या मंत्रिमंडळाला सभागृह पाहण्याची संधी सहज मिळाली, अशा शब्दांत यिनच्या मंत्र्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. विधान भवनाच्या प्रांगणात यिनचे सुटाबुटातले मंत्री पाहून तेथील कर्मचारी व अधिकारीही प्रभावित झाले.

महाराष्ट्र

पाच वर्षांचा कालावधी; 470 कोटींचा निधी मुंबई: खून, बलात्कार, दरोडा, अनैतिक मानवी वाहतूक, हुंडाबळी, सायबर क्राईम आदी...

03.03 AM

मुंबई: प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेअंतर्गत दोन वर्षांत 20 हजारांचे अनुदान...

02.03 AM

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट...

01.24 AM