ऑनलाइन मिळणार 'वहाण'

मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

आतापर्यंत फक्त कोल्हापुरी चपलांचं मार्केट आपल्याला पहायला मिळालं. त्याची लोकप्रियता सुद्धा भरपुर आहे पण कोल्हापुरी प्रमाणेच इतरही अनेक पारंपारिक पद्धतीने चपला आपल्याकडे बनवल्या जातात ज्या आजपर्यंत आपल्या समोर आल्या नव्हत्या. अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये हे कारागीर दडलेले आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने चपला बनवण्याचे काम करतात.

पारंपारिक चपला म्हणलं की डोळ्यासमोर कोल्हापुरी चप्पल येते. पण आपल्याकडं अशा आणखी कितीतरी पारंपारिक चपला बनवणारे कारागीर आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्षे पारंपारिक चपला बनवण्याचा व्यवसाय करतात. फक्त योग्य बाजारपेठ न मिळाल्यामुळे त्या ठरावीक लोकांपर्यंत मर्यादित राहिल्या आहेत.

याच गोष्टीला समोर ठेवून मुंबईच्या भुषण कांबळे या युवकाने या कारागिरांना बाजारपेठ आणि त्यांच्या कलेला ओळख मिळवुन देण्यासाठी दोन महिन्यांपुर्वी www.vhaan.com ही वेबसाइट सुरु केली. या वेबसाइटवर वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक चपला विकत घेता येतात. कोल्हापुर, अतनी, सोलापुर, सातारा, वाई, मेढा, महाबळेश्वर, रायगड, संगमेश्वर, निपाणी इत्यादी ठिकाणी बनणाऱ्या पारंपारिक चपलासुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

आतापर्यंत फक्त कोल्हापुरी चपलांचं मार्केट आपल्याला पहायला मिळालं. त्याची लोकप्रियता सुद्धा भरपुर आहे पण कोल्हापुरी प्रमाणेच इतरही अनेक पारंपारिक पद्धतीने चपला आपल्याकडे बनवल्या जातात ज्या आजपर्यंत आपल्या समोर आल्या नव्हत्या. अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये हे कारागीर दडलेले आहेत ज्यांच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने चपला बनवण्याचे काम करतात. या कारागिरांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी 'वहाण' हा नवीन प्लॅटफॉर्म आहे.

या वेबसाइटचा उद्देश फक्त ऑनलाइन विक्री नसून ज्या लोकांना यापैकी एखादी कला शिकण्याची इच्छा असेल त्यांना कारागिरांशी संपर्क करुन देणे हा सुद्धा आहे. पारंपारिक पद्धतीने चपला बनवणाऱ्यांपैकी असेही काही कारागीर आहेत की ज्यांची पुढची पिढी या व्यवसायासाठी इच्छुक नाही. अशावेळी ती कला जोपासली जावी या उद्देशाने 'वहाण' च्या माध्यामातुन ज्यांना हे शिकण्याची इच्छा आहे त्यांना थेट कारागिरांशी संपर्क करता येणार आहे.

जुलै महिन्यात सुरु केलेल्या या वेबसाईटवर गेल्या दोन महिन्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे कारागीर, त्यांच्या कलाकृती, त्याबाबतचा इतिहास 'वहाण'च्या फेसबुक पेज, ब्लॉगच्या वरुन मांडण्यात येतो. आजपर्यंत समोर न आलेले हे पारंपारिक 'वहाण' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करण्यात येत आहे.

Web Title: yogesh bankar writes about vhaan online portal for traditional footwear

टॅग्स