किम कर्दाशियनला लुटल्याप्रकरणी 16 अटकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

पॅरिस : रिऍलिटी टीव्हीची स्टार किम कर्दाशियन वेस्ट हिला लुटणाऱ्या 16 जणांना फ्रान्समधील पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मागील वर्षी पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून किम हिला लुटले होते. पोलिसांनी पॅरिसमध्ये छापासत्र सुरू केले असून, मोठ्या प्रमाणात पैसे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पॅरिसमधील अलिशान हॉटेलमध्ये चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून किमचे हात बांधून तिला स्वच्छतागृहात कोंडले होते. त्यानंतर किम हिचे सुमारे 95 लाख डॉलर म्हणजे तब्बल 65 कोटी रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. घटनास्थळी आढळलेल्या DNA नमुन्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा DNA एका दरोडेखोराचा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी छापे सत्र सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.

फ्रेंच पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केलेल्यांमधील एकाचे वय 72 वर्षे आहे, तर इतरांपैकी 40, 50 आणि 60 वयाचे लोक आहेत. यावरून हे सराईत गुन्हेगार आहेत असे दिसते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये किम हिला लुटणारे आहेत का हे खात्रीशीररीत्या फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.