'बाॅर्डर' या चित्रपटानंतर जे.पी. दत्ता साकारणार 'पलटन'

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

जे. पी.दत्ता हे नाव हिंदी सिनेसृष्टीत नवे नाही. लार्जर दॅन लाईफ सिनेमे केले ते त्यांनीच. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी रसिकांना बाॅर्डर या सिनेमाची भेट दिली. आता ते नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचे नाव पलटन असून यातील कलाकारांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार खर्याखुर्या जवानांना ते या सिनेमात महत्त्वाची भूमिका देणार आहेत. 

मुंबई : जे. पी.दत्ता हे नाव हिंदी सिनेसृष्टीत नवे नाही. लार्जर दॅन लाईफ सिनेमे केले ते त्यांनीच. भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी रसिकांना बाॅर्डर या सिनेमाची भेट दिली. आता ते नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचे नाव पलटन असून यातील कलाकारांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार खर्याखुर्या जवानांना ते या सिनेमात महत्त्वाची भूमिका देणार आहेत. 

या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना जे.पी. म्हणाले, 'आता पुन्हा एकदा नव्याने मोठा सिनेमा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या सिनेमाचा विषय माझ्या अत्यंत जवळचा असून ही गोष्ट लोकांना खूप आवडेल याची मला खात्री आहे. बाॅर्डरप्रमाणेच हा सिनेमाही भव्य दिव्य असणार आहे.'

यावेळी त्यांनी पलटन या सिनेमाचे पहिले पोस्टरही लाॅंच केले. बाॅर्डर या यशस्वी सिनेमाला 20 वर्षे झाल्याबद्दलच्या सेलिब्रेशनचे आयोजन त्यांनी केले होते. यावेळी कलाकारांना गौरवण्यात आले. 

मनोरंजन

पुणे : निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलेला बापजन्म हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सचिन खेडेकर...

09.03 AM

मुंबई :  गुरमित राम रहिमच्या कारनाम्यांनी अवघी दुनिया अचंबित झाली होती. त्याची संपत्ती, त्याचे सिनेमे आणि आता त्याला शिक्षा...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबईत होणाऱ्या १९ व्या 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस' म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हल'साठी सर्वनाम या मराठी सिनेमाची...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017