आलियाचे संजू बाबा 

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त अभिनित महेश भट दिग्दर्शित सुपरहिट ठरलेला चित्रपट "नाम'चा सिक्वेल बनणार असल्याचं बोललं जातंय. महेश भट या चित्रपटाची निर्मिती करणार असून यात मुख्य भूमिकेत क्‍युट गर्ल आलिया दिसणार आहे. या सिक्वेलमध्ये आलियाच्या वडिलांच्या भूमिकेत संजय दत्त दिसणारेय. सूत्रांच्या माहितीनुसार महेश भट याबाबत संजय दत्तशी बोलले असून त्याने होकारही दिला आहे. नुकतेच हे दोघे भेटले आणि यावर त्यांनी खूप चर्चाही केली. सध्या संजय दत्त "भूमी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे; तर आलियाचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा "बद्रीनाथ की दुल्हनियां' बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई करतोय.

बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त अभिनित महेश भट दिग्दर्शित सुपरहिट ठरलेला चित्रपट "नाम'चा सिक्वेल बनणार असल्याचं बोललं जातंय. महेश भट या चित्रपटाची निर्मिती करणार असून यात मुख्य भूमिकेत क्‍युट गर्ल आलिया दिसणार आहे. या सिक्वेलमध्ये आलियाच्या वडिलांच्या भूमिकेत संजय दत्त दिसणारेय. सूत्रांच्या माहितीनुसार महेश भट याबाबत संजय दत्तशी बोलले असून त्याने होकारही दिला आहे. नुकतेच हे दोघे भेटले आणि यावर त्यांनी खूप चर्चाही केली. सध्या संजय दत्त "भूमी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे; तर आलियाचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा "बद्रीनाथ की दुल्हनियां' बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. "नाम'च्या सिक्वेलबाबत अधिकृतरीत्या अद्याप जाहीर केलेलं नाही. मात्र या दोघांना पहिल्यांदाच स्क्रीनवर एकत्र पाहण्यात एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असेल. 
 

Web Title: aalia bhat fathers sanjubaba