अंक तिसरा #Live : ते तर बापच आणि त्यांची मुलंही बाप.

रविवार, 24 सप्टेंबर 2017

टिळक स्मारक मंदिराच्या पायऱ्यांकडे एरवी फार कुणाचं लक्ष जात नाही. पण रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर मात्र जो तो या पायऱ्यांच्या आवारात थबके फोटो काढे आणि पुढे जाई. कारण या पायऱ्यांवर जमून आला होता ई सकाळचा अंक तिसरा. यात ई सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आले होते आनंद इंगळे, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, अजित परब आणि आदित्य इंगळे. या अंकात नाटकाच्या गमतीजमती सांगितल्या गेल्याच, पण पुलं आणि अत्रे यांचं लिखाण पुढच्या पिढीपर्यंत का गेलं पाहिजे तेही इथे नमूद करण्यात आलं. 

पुणे : टिळक स्मारक मंदिराच्या पायऱ्यांकडे एरवी फार कुणाचं लक्ष जात नाही. पण रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर मात्र जो तो या पायऱ्यांच्या आवारात थबके फोटो काढे आणि पुढे जाई. कारण या पायऱ्यांवर जमून आला होता ई सकाळचा अंक तिसरा. यात ई सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह आले होते आनंद इंगळे, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, अजित परब आणि आदित्य इंगळे. या अंकात नाटकाच्या गमतीजमती सांगितल्या गेल्याच, पण पुलं आणि अत्रे यांचं लिखाण पुढच्या पिढीपर्यंत का गेलं पाहिजे तेही इथे नमूद करण्यात आलं. 

आम्ही आणि आमचे बाप.. FB live

आदित्य इंगळे लिखित दिग्दर्शित हे नाटक म्हणजे एक संवाद आहे. याबाबत बोलताना आदित्य म्हणाला, मुळात ते सर्व लिखाण अत्रे आणि पुलंचं आहे. मी केवळ त्यातला दुवा सांधण्याचा प्रयत्न केला. हे नाटक म्हणजे पूर्ण नाटक नसून यात पुलं, अत्रे यांची पात्रं आहेत. काही उतारे आहेत. गाणी आहेत. काहीतरी नवं पुढच्या पिढीपर्यंत पोचावं म्हणून हा प्रयोग करण्यात आला आहे. 

या आदित्यच्या भूमिकेला आनंद, अतुल यांनीही दुजोरा दिला. या सर्वांनी या नाटकातले किस्से, काही अनुभव शेअर केलेच, पण या निमित्ताने समृद्ध असलेल्या मराठी भाषेत आपल्याकडे अनेक बाप माणसांनी काम करून ठेवलं आहे. ते काम लोकांपर्य़ंत येण्याची गरज असण्यावरही एकमत झालं. 

आम्ही आणि आमचे बाप हे नाटक सध्या पुलं आणि अत्रेंवर असलं तरी पुढच्य काळात काही कविता, गीतांवर आधारलेले कार्यक्रम करायलाही आम्हाला आवडेल असं यावेळी अतुल परचुरे म्हणाले.