आमीर खानवरही आता मोदी इफेक्ट

सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जपानचे पंतप्रधान गुजरातमध्ये येऊन गेले आणि पुन्हा एकदा गुजरात चर्चेचा विषय झालं. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरात नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता त्यात आणखी एक नवी भर पडली आहे ती अशी की अभिनेता आमीर खानवरही हा मोदींचा गुजराती इफेक्ट झाला आहे. कारण आता आमीरबाबूंना गुजराती खाणं आवडू लागलं आहे. 

मुंबई : जपानचे पंतप्रधान गुजरातमध्ये येऊन गेले आणि पुन्हा एकदा गुजरात चर्चेचा विषय झालं. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरात नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता त्यात आणखी एक नवी भर पडली आहे ती अशी की अभिनेता आमीर खानवरही हा मोदींचा गुजराती इफेक्ट झाला आहे. कारण आता आमीरबाबूंना गुजराती खाणं आवडू लागलं आहे. 

सध्या आमीर खानही गुजरातमध्ये आहे. सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो दोन दिवस बडोद्यात होता. प्रमोशनदरम्यान आमीर नेहमीच आपल्या खाण्यावर खूप लक्ष देत असतो. सर्वसाधारणपणे तो तेल, तूप आदी गोष्टी तपासून घेत असोत. पण गुजरातमध्ये आल्यानंतर मात्र त्याने आपलं डाएट गुंडाळून ठेवलं आहे. गुजराती पदार्थाच्या वेगवेगळ्या डीश त्याला खूप आवडू लागल्या आहेत. गुजराती डाळ, बाजरीची रोटी आदी प्रकार आमीरला खूप आवडू लागले आहेत.  हे खाणं त्याला इतकं आवडलं की तिथल्या शेफना बोलावून त्याला आमीरने याची कल्पना दिली आणि आजवरचं सर्वोत्तम गुजराती जेवण आपण जेवल्याची पावती दिली. 

आमीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुजराती खाणं आमीरला आवडणं हा एक प्रकारचा मोदी इफेक्टच असल्याच्या कमेंट व्हायरल झाल्या. 

Web Title: aamir khan likes gujarati food esakal news