'दंगल'ची 3 दिवसांत 100 कोटींची कमाई

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

कुस्तीवर आधारित 'दंगल' हा चित्रपट महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात आमीरने स्वतः एक गाणे गायले आहे. 

मुंबई - मिस्टर परफेक्‍शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमीर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच 100 कोटी कमाईचा आकडा पार केला आहे. 

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी 'दंगल'च्या कमाईचे आकडे ट्विट करत चित्रपटाच्या कमाईविषयी माहिती दिली. शुक्रवारी 29.78, शनिवारी 34.82 आणि रविवारी 42.35 कोटी अशी एकूण तीन दिवसांत 106.95 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. यावर्षी पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या 'सुल्तान' चित्रपटाचा विक्रम 'दंगल'ने मोडला आहे.

कुस्तीवर आधारित 'दंगल' हा चित्रपट महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात आमीरने स्वतः एक गाणे गायले आहे. 

टॅग्स