अभिनेते सीताराम पांचाल यांचेे निधन

टीम ई सकाळ
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई : पीपली लाईव्ह, पानसिंग तोमर, जाॅली एलएलबी आदी अनेक चित्रपटांतून भूमिका सााकारणारे अभिनेते सीताराम पांचाल यांचे आज मुंबईत राहत्या घरी निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मधल्या काळात त्यांना आर्थिक विवंचनेलाही सामोरे जावे लागले होते. 

मूळ हरियाणाचे असलेले पांचाल यांनी स्लमडाॅग मिलेनिअरमध्येही भूमिका बजावली होती. बुधवारीच त्यांच्या लग्नाचाा वाढदिवस होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावली होती. मुख्य भूमिका न मिळताही सीताराम यांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. 