लावण्यवती दीपाली सय्यद पूरग्रस्तांना करणार ५ कोटींची मदत...कशी...? वाचा इथे

Deepali-Sayyad
Deepali-Sayyad

पुणे : मनमोहून टाकणारे नृत्य अन् दर्जेदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांना मोहिनी घालणारी लावण्यवती अभिनेत्री दीपाली भोसले- सय्यद पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आली आहे. विशेष म्हणजे ती आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल पाच कोटी रुपयांची मदत उभी करणार असून पूरग्रस्तांना दिलासा देणार आहे. 
दीपाली भोसले-सय्यद फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना ही मदत देण्यात येणार आहे.

याबाबत दीपाली म्हणाली, "आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहोत. ज्यांना आई किंवा वडील नाहीत, अशा गरीब व गरजू एक हजार मुलींची जबाबदारी उचलणार आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीच्या नावावर 50 हजार रुपयांची मुदतठेव पावती करणार आहोत. या सर्व मुलींचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. मात्र, यासाठी भरघोस निधीची गरज आहे.

हा निधी आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जमा करणार आहे. त्याला कदाचित दोन-तीन वर्षही लागू शकतील. त्यासाठी प्रयत्नही करणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com