दाऊदचं नाव घेताच उसळली मंदाकिनी, झाला रंगाचा बेरंग

बॉलीवूडमध्ये 80 च्या दशकांत आपल्या अभिनय आणि बोल्डनेसमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये मंदाकिनीचे नाव घेतले जाते.
Mandakini and Dawood
Mandakini and Dawoodesakal

Entertainment News: बॉलीवूडमध्ये 80 च्या दशकांत आपल्या अभिनय आणि बोल्डनेसमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये मंदाकिनीचे नाव घेतले जाते. ही (Bollywood Actress Mandakini) अभिनेत्री तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. ती एका म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून (Bollywood News) प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज कपूर दिग्दर्शित राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये मंदाकिनीनं साकारल्या भूमिकेनं त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी त्यांनी दिलेल्या एका दृश्यामुळे हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला होता. काहीही झालं तरी प्रेक्षकांनी मंदाकिनीवर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या इतर चित्रपटांना देखील मनपूर्वक दाद दिल्याचे दिसुन आले होते.

आता पुन्हा मंदाकिनी या चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण त्यांना पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नानं हैराण केलं. तो प्रश्न होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित. त्यामुळे संतापलेल्या मंदाकिनीनं त्या पत्रकाराच्या पुढील प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. सध्या मंदाकिनी यांचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होणार असून त्यामध्ये त्या तब्बल 26 वर्षानंतर पुनरागमन करणार आहेत. यात त्यांचा मुलगाही असणार आहे. याची माहिती देण्यासाठी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यात एका पत्रकारानं मंदाकिनी यांना भलताच प्रश्न विचारल्यानं मोठी पंचाईत झाल्याचे दिसून आले. तो प्रश्न होता दाऊदच्या संदर्भातील. मुंबईमध्ये झालेल्या त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला आहे.

Mandakini and Dawood
PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं!

राम तेरी गंगा मैलीमध्ये मंदाकिनी यांचे हिरो म्हणून ज्यांनी काम केले होते त्या राजीव कपूर यांच्या तुलसीदास ज्युनिअरचा प्रिमिअर देखील मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याला मंदाकिनी हजर होत्या. त्यावेळी त्यांना प्रेसच्या काही व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नानं निरुत्तर तर केले मात्र त्यामुळे त्या नाराज झाल्याचे दिसून आले. दरवेळी असे प्रश्न विचारणे गरजेचे आहे का, ज्या गोष्टी इतक्या वर्षांपूर्वी होऊन गेल्या त्या पुन्हा विचारणे कितपत योग्य आहे, मला दरवेळी त्यावरुन का ट्रोल केले जाते असा प्रश्न मंदाकिनी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्या चित्रपटाच्या पीआरओनं मध्यस्थी करत दाऊदसंबंधी कोणताही प्रश्न विचारु नये अशी ताकीद पत्रकारांना दिली.

Mandakini and Dawood
पराभवानंतर चंद्रकांत पाटलांना पोहचवले हिमालयात; पाहा Viral Meme's

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com