निवेदिता सराफ झाल्या नॉस्टेल्जिक

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमनं नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक यांचाही समावेश होता. निवेदिता सराफ आणि कोल्हापूर यांचं जवळचं नातं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या 'धुमधडाका' या चित्रपटापासून अनेक चित्रपटांचं त्यांनी कोल्हापूरमध्ये चित्रीकरण केलं होतं. त्या सगळ्या आठवणी या भेटीच्या निमित्तानं ताज्या झाल्या.  कोल्हापूरमध्ये राहताना लावलेली लायब्ररी, तिथली भटकंती, महालक्ष्मी मंदिरातल्या मन शांत करणाऱ्या अनुभवापर्यंतच्या अनेक आठवणी होत्या. या कोल्हापूर दौऱ्यात ‘दुहेरी’ टीमनं नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीचंही दर्शन घेतलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराजवळ खरेदीही केली.

मुंबई : स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमनं नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक यांचाही समावेश होता. निवेदिता सराफ आणि कोल्हापूर यांचं जवळचं नातं आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या 'धुमधडाका' या चित्रपटापासून अनेक चित्रपटांचं त्यांनी कोल्हापूरमध्ये चित्रीकरण केलं होतं. त्या सगळ्या आठवणी या भेटीच्या निमित्तानं ताज्या झाल्या.  कोल्हापूरमध्ये राहताना लावलेली लायब्ररी, तिथली भटकंती, महालक्ष्मी मंदिरातल्या मन शांत करणाऱ्या अनुभवापर्यंतच्या अनेक आठवणी होत्या. या कोल्हापूर दौऱ्यात ‘दुहेरी’ टीमनं नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीचंही दर्शन घेतलं. महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराजवळ खरेदीही केली.

कोल्हापूरच्या या नॉस्टेल्जिक अनुभवाबद्दल निवेदिता सराफ म्हणाल्या, 'आजवरचा माझा प्रवास कोल्हापूरपासूनच सुरू झाला. त्यामुळे कोल्हापूरचं माझ्या मनातलं स्थान खूपच स्पेशल आहे. चित्रीकरणाच्या निमित्ताने सहा सहा महिने मी कोल्हापूरला येऊन रहायचे. तिथलं जेवणं, माणसं, माती सारंच अद्भूत आहे. तांबडा-पांढरा रश्श्याची चव तर वर्णनापलीकडे आहे. कोल्हापूरनं मला खूप काही दिलं आहे.'

सुहासिनी सूर्यवंशी (निवेदिता सराफ), दृश्यांत सूर्यवंशी (संकेत पथक) आणि सोनिया कारखानीस (सुपर्णा श्याम) या तीन व्यक्तीरेखांतील नातं पुढे कसं उलगडतं, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल 'दुहेरी' या कौटुंबिक थरार मालिकेत, सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाह वर.

Web Title: Actress Nivedita saraf gets nostalgic in kolhapur esakal news