'इन निक ऑफ टाइम'मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस

Actress Priyanka Chopra Is A Top Trending Actress
Actress Priyanka Chopra Is A Top Trending Actress

काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती. त्यामुळेच तर प्रियंका बॉलिवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनलेली आहे.

सलमानची फिल्म भारतचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियंका भारत चित्रपट सोडत असल्याची घोषणा करतानाच 'इन निक ऑफ टाइम' चा सूचक उल्लेख केला होता. त्यामुळे प्रियंका चर्चेत आली होती 94 गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियंका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियंका निक जोनाससोबत गोव्यात फिरायला गेली होती त्यानंतर प्रियंकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत भारत हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच ती सतत बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आणि सोशलमीडियामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामुळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री झालीय.“

अश्वनी कौल पुढे म्हणतात, "14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रेटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com