आदित्य नारायणचं कमबॅक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

2010 साली "शापित' चित्रपटातून अभिनेता व गायक आदित्य नारायणने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरून गायबच झाला होता. आता तो पुन्हा एकदा संगीतमय सिनेमात काम करण्यासाठी सज्ज झालाय. या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. कारण तो फक्त अभिनयच करणार नाही, तर चित्रपटातील काही गाणीही तो गाणार आहे. आदित्य सांगतो की, अभिनयाबाबतची घोषणा मी लवकरच करेन. सध्या तरी मी हेच सांगू शकतो की हा म्युझिकल चित्रपट आहे. यात मी मुख्य भूमिका साकारणार आहे आणि यातील गाणी मी गाणार आहे. त्यामुळे मी या प्रोजेक्‍टस्‌साठी खूपच उत्सुक आहे.

2010 साली "शापित' चित्रपटातून अभिनेता व गायक आदित्य नारायणने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावरून गायबच झाला होता. आता तो पुन्हा एकदा संगीतमय सिनेमात काम करण्यासाठी सज्ज झालाय. या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. कारण तो फक्त अभिनयच करणार नाही, तर चित्रपटातील काही गाणीही तो गाणार आहे. आदित्य सांगतो की, अभिनयाबाबतची घोषणा मी लवकरच करेन. सध्या तरी मी हेच सांगू शकतो की हा म्युझिकल चित्रपट आहे. यात मी मुख्य भूमिका साकारणार आहे आणि यातील गाणी मी गाणार आहे. त्यामुळे मी या प्रोजेक्‍टस्‌साठी खूपच उत्सुक आहे. तसंच आदित्य सारेगमप या सिंगिंग रिऍलिटी शोचे पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. याविषयी तो म्हणाला, ""या शोचे जवळपास सहा सिझन मी केलेत. देशातील सर्वश्रेष्ठ गायकाला शोधणे ही या शोची खासियत आहे.''