अदनानच्या घरी नन्ही परी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

अदनान सामी या पाकिस्तानी गायकाला आता भारतीय नागरिकत्व मिळून दोन वर्षं होत आलीत. त्यातच अदनान सामी आणि त्याची पत्नी रोया यांना नुकतीच एक गोड मुलगी झाल्याची बातमी अदनान सामीने ट्‌विटरद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली.

त्याने त्याच्या मुलीचे नाव मदिना सामी खान असे ठेवले आहे. तो म्हणतो, "त्याची मुलगी ही त्याच्याकडे असलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. तिच्यामुळे त्याला गाण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली आहे. ती माझ्या आयुष्याचं केंद्रस्थान आहे. माझी पत्नी आणि मुलगी दोघीही सुखरूप आहेत.'

रोया ही अदनानची तिसरी पत्नी आहे. याआधी त्याने झेबा बखत्यार आणि सबा यांच्याशी लग्न केले होते. पण त्यांच्याबरोबरचे त्याचे विवाह अयशस्वी ठरले. त्याला झेबा या पहिल्या पत्नीपासून झालेला "अझान' नावाचा मुलगा आहे.