कपिल शर्माच्या शो मध्ये 'ऍडल्ट' फिल्म स्टार

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

मोनिकाने 'मेन नॉट अलाउड' आणि 'काम सुंदरी' या 'सॉफ्ट पॉर्न फिल्म्स'मध्ये काम केले आहे. लाईफ ओके वाहिनीवरील 'हर मर्द का दर्द' मालिकेत ती दिसली होती.

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादानंतर आता कपिल शर्माच्या शो मध्ये 'ऍडल्ट' फिल्म स्टार मोनिका कॅस्टेलिनो सहभागी होणार आहे.

कपिल आणि सुनील यांच्यातील वादानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम शो च्या लोकप्रियतेवर झाला असून, आता नव्याने या शो ला उभारी देण्यासाठी 'ऍडल्ट' फिल्म स्टार असलेल्या मोनिकाला शो मध्ये स्थान देण्यात आले आहे. मोनिका कायमस्वरुपी या टीमची सदस्य असणार आहे.

मोनिकाने 'मेन नॉट अलाउड' आणि 'काम सुंदरी' या 'सॉफ्ट पॉर्न फिल्म्स'मध्ये काम केले आहे. लाईफ ओके वाहिनीवरील 'हर मर्द का दर्द' मालिकेत ती दिसली होती.