ऐश्‍वर्या-मणिरत्नम पुन्हा एकत्र 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

अभिनेत्री ऐश्‍वर्या राय गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबत "ए दिल है मुश्‍कील' चित्रपटात झळकली. त्या चित्रपटानंतर तिच्या आगामी प्रोजेक्‍ट्‌सबद्दल बरेच तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आता सर्व अनुमानांना पूर्णविराम मिळालाय. ऐश्‍वर्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचं समजतंय. याआधी दोघांनी "इरुवर', "गुरू' व "रावण' या चित्रपटांत एकत्र काम केलंय. एका मुलाखतीत ऐश्‍वर्या म्हणाली, की "व्यक्तिगत कारणासाठी गेली पाच महिने मी ब्रेक घेतला होता आणि त्यात मी खूश होते. कारण माझ्या कोणत्याच प्रोफेशनल मीटिंग्स नव्हत्या. गेल्या आठवड्यापासून मी पुन्हा काम सुरू केलंय.

अभिनेत्री ऐश्‍वर्या राय गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबत "ए दिल है मुश्‍कील' चित्रपटात झळकली. त्या चित्रपटानंतर तिच्या आगामी प्रोजेक्‍ट्‌सबद्दल बरेच तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आता सर्व अनुमानांना पूर्णविराम मिळालाय. ऐश्‍वर्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचं समजतंय. याआधी दोघांनी "इरुवर', "गुरू' व "रावण' या चित्रपटांत एकत्र काम केलंय. एका मुलाखतीत ऐश्‍वर्या म्हणाली, की "व्यक्तिगत कारणासाठी गेली पाच महिने मी ब्रेक घेतला होता आणि त्यात मी खूश होते. कारण माझ्या कोणत्याच प्रोफेशनल मीटिंग्स नव्हत्या. गेल्या आठवड्यापासून मी पुन्हा काम सुरू केलंय. काही प्रोजेक्‍टस्‌बाबत मीटिंग सुरू आहेत. त्यातील दोन विषय मला आवडलेत. त्याच्या स्क्रीप्ट वाचायला सुरुवात केलीय.' सूत्रांच्या माहितीनुसार, मणिरत्नम व ऐश्‍वर्या पुन्हा एकदा एकत्र काम करताहेत. या चित्रपटात रोमॅंटिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदी व तमीळ या दोन भाषांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत दोघांमध्ये काही वर्षांपासून चर्चा सुरू होती आणि आता अखेर दोघांनी त्या प्रोजेक्‍टवर काम करायला सुरुवातही केलीय.