अक्षय कुमारची कुत्र्यांशी 'क्युट बॉक्सिंग'!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 24 मार्च 2017

ट्विटर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी वरचे वर संवाद साधणारा अभिनेता अक्षय कुमार आता वेगळ्या स्वरुपात दिसत आहे. यावेळी त्याने एका वेगळ्या 'संवादा'चा व्हिडिओ शेअर केलाय. हा संवाद आहे प्राण्यांशी! कुत्र्याच्या छोट्या पिलांशी मैत्री करीत त्यांच्याशी चक्क बॉक्सिंग केली. मात्र, कराटे चँपियन असलेल्या अक्षयची ही बॉक्सिंग अॅक्शन चित्रपटासारखी नाही, तर ती एकदम क्युट आहे हे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच. 

समाजातील विविध घटकांच्या मदतीसाठी अक्षय नेहमीच धावून जात असतो. लोकांनाही त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन तो करतो. यावेळी त्याने आपली भूतदया दाखवली आहे. याबद्दल तो आता आपल्या चाहत्यांना काही आवाहन करतो काय हे लवकरच कळेल.  

'सोशल' अक्षयची हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत
अलीकडेच छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात 11 मार्च रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या अकरा जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने 1.08 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याने केलेल्या मदतीबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अक्षयचे कौतुक केले होते.

जवानांसाठी अभिनव कल्पना

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारने एक नवीन कल्पना मांडली होती. सर्व भारतीयांना सहजपणे हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत करता यावी यासाठी एक वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशन बनविण्याची इच्छा अक्षय कुमार याने व्यक्त केली आहे. 

कपडे नव्हे विचार छोटे

बंगळूरमधील छेडछाडीच्या घटनेला त्या मुलीचे छोटे कपडे जबाबदार आहेत म्हणणाऱ्या अबू आझमींना अक्षयने सणसणीत उत्तर दिले होते. 'तिचे छोटे कपडे नव्हे, तर तुमचे छोटे विचार त्याला कारणीभूत आहेत' असे अक्षयने म्हटले होते.

Web Title: akshay kumar boxing with cute little goons

व्हिडीओ गॅलरी