अक्षयकुमार भक्तीमय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

अक्षयकुमार याने अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. "ओ माय गॉड', "स्पेशल 26', "हॉलिडे', "जॉली एलएलबी 2' असे अनेक चित्रपट त्याने केले आणि हिटही करून दाखविले. "एअरलिफ्ट' व "रुस्तम' यांसारख्या चित्रपटातून सत्य घटनांवर आधारित चित्रपटांमध्येही त्याने उत्तम प्रकारे अभिनय करून, त्या चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आता अक्षय आणखी एका बायोपिकमध्ये काम करतोय आणि ते म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून भक्तिसंगीत जगतातील आदरणीय गुलशनकुमार आहेत. मुघल या चित्रपटात अक्षय गुलशनकुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, या चित्रपटाच्या नावाचं कुतूहल आहे. मुघल की मोगल, अशी चर्चा आहे.

अक्षयकुमार याने अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. "ओ माय गॉड', "स्पेशल 26', "हॉलिडे', "जॉली एलएलबी 2' असे अनेक चित्रपट त्याने केले आणि हिटही करून दाखविले. "एअरलिफ्ट' व "रुस्तम' यांसारख्या चित्रपटातून सत्य घटनांवर आधारित चित्रपटांमध्येही त्याने उत्तम प्रकारे अभिनय करून, त्या चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. आता अक्षय आणखी एका बायोपिकमध्ये काम करतोय आणि ते म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून भक्तिसंगीत जगतातील आदरणीय गुलशनकुमार आहेत. मुघल या चित्रपटात अक्षय गुलशनकुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, या चित्रपटाच्या नावाचं कुतूहल आहे. मुघल की मोगल, अशी चर्चा आहे. ते काही दिवसांत कळेलच. गुलशनकुमार यांची पत्नी सुदेश कुमारी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटासाठी अक्षय विशेष तयारी करत असणार नक्कीच. कारण- गुलशनकुमार यांची शैली त्याला या चित्रपटासाठी अंगीकारावी लागणार आहे. अभिनेता अक्षयकुमार याबद्दल बोलताना म्हणाला, "मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो की गुलशनकुमार यांना जाणून घेण्याची संधी मला यानिमित्ताने मिळाली. आमची ओळख माझा पहिला चित्रपट "सौगंध'च्या दरम्यान झाली होती. आमच्या दोघांत अनेक गोष्टींमध्ये साधर्म्य होतं. आमच्या दोघांची पार्श्‍वभूमीही सारखी होती. त्यांची भूमिका स्क्रीनवर साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.' 
 

Web Title: akshay kumar spiritual movie in Mogul