अस्सा आहे मी... 

संकलन : भक्ती परब  
सोमवार, 20 मार्च 2017

"अस्सा आहे मी', असं म्हणत देखणा अभिनेता अक्षय म्हात्रेने आपल्याविषयीची काही माहिती आपल्या चाहत्यांसाठी उघड केलीय. सध्या "पिया अलबेला' या मालिकेमुळे अक्षय चर्चेत आहे. नरेन नावाच्या वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळेच त्याने एका वेब पोर्टलसाठी दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला. त्या वेळी तो म्हणाला, मला मुंबईकर ही ओळख जास्त भावते. "पिया अलबेला' या मालिकेआधी मी मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलंय. "सावर रे' ही माझी पहिली मराठी मालिका. त्याआधी कॉलेजमध्ये असताना मी नाटक, एकांकिकांमध्ये अभिनय करायचो.

"अस्सा आहे मी', असं म्हणत देखणा अभिनेता अक्षय म्हात्रेने आपल्याविषयीची काही माहिती आपल्या चाहत्यांसाठी उघड केलीय. सध्या "पिया अलबेला' या मालिकेमुळे अक्षय चर्चेत आहे. नरेन नावाच्या वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळेच त्याने एका वेब पोर्टलसाठी दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला. त्या वेळी तो म्हणाला, मला मुंबईकर ही ओळख जास्त भावते. "पिया अलबेला' या मालिकेआधी मी मराठी मालिका आणि चित्रपटात काम केलंय. "सावर रे' ही माझी पहिली मराठी मालिका. त्याआधी कॉलेजमध्ये असताना मी नाटक, एकांकिकांमध्ये अभिनय करायचो. माझ्या आईला अभिनेता अक्षयकुमार खूप आवडायचा, म्हणूनच तिने माझं नाव अक्षय ठेवलं. मी लहानपणापासून सर्वच खेळांत भाग घ्यायचो. कारण मला अभिनयाबरोबरच खेळाची प्रचंड आवड आहे. जेव्हा मला शूटिंगच्या दरम्यान वेळ मिळतो, तेव्हा मी सिनेमा किंवा वेब सीरिज बघणं पसंत करतो. त्याने "युथ' नावाच्या मराठी चित्रपटातही काम केलं आहे. अक्षयला बॉलीवूड संगीत ऐकायला आणि त्यावर नृत्य करायला आवडतं. त्याचे मित्र त्याला म्हणतात, की तो खूप छान गातोही. आणि त्याच्या मित्रांचं म्हणणं त्याला पटतं. जसं तो "पिया अलबेला'मध्ये नरेनच्या भूमिकेत वागतोय, तसाच तो खऱ्या आयुष्यातही शिस्तप्रिय आणि टापटीप राहणं पसंत करतो. वेल! या मराठमोळ्या अक्षयला सध्या तरी आपण शुभेच्छा देऊया. 

 

Web Title: akshay mhatre marathi actor