अक्षयच्या 'रुस्तम'ची 50 कोटींची कमाई

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

मुंबई : सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘रुस्तम‘ या अक्षय कुमारच्या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांमध्ये 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, आशुतोष गोवारीकर यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मोहेंजोदारो‘ या चित्रपटाबरोबर प्रदर्शित होऊनही ‘रुस्तम‘ने ही कामगिरी केली आहे.

टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 14.11 कोटी, शनिवारी 16.43 कोटी आणि रविवारी 19.88 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट ‘100 कोटी क्‍लब‘मध्ये दाखल होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे. यापूर्वी ‘हाऊसफुल 3‘ आणि ‘एअरलिफ्ट‘ या दोन चित्रपटांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक व्यवसाय केला होता.

Web Title: Akshay's' rustam earning 50 crore