आलिया सिद्धार्थची आशिकी 

संकलन : चिन्मयी खरे 
सोमवार, 6 मार्च 2017

बॉलीवूडचे दिग्दर्शक मोहित सूरी "आशिकी'चा तिसरा सिक्वेल बनवण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहून झाली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट यांच्या विशेष फिल्मस्‌‌‌ बॅनर खाली होणार, अशी चर्चा आहे. मग या चित्रपटात कोणती तरी हटके जोडी नको का? अशी चर्चा आहे की, बॉलीवूडचे लव्हबर्डस्‌ आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आशिकीच्या तिसऱ्या भागात काम करणार आहेत. त्या दोघांना या चित्रपटाची स्क्रिप्टही खूप आवडली आहे. आणि या दोघांची केमिस्ट्री पाहता या चित्रपटासाठी यापेक्षा हीट जोडी दिग्दर्शकांना मिळूच शकत नाही. हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र काम करताना आपल्याला दिसतील.

बॉलीवूडचे दिग्दर्शक मोहित सूरी "आशिकी'चा तिसरा सिक्वेल बनवण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहून झाली आहे आणि या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट यांच्या विशेष फिल्मस्‌‌‌ बॅनर खाली होणार, अशी चर्चा आहे. मग या चित्रपटात कोणती तरी हटके जोडी नको का? अशी चर्चा आहे की, बॉलीवूडचे लव्हबर्डस्‌ आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आशिकीच्या तिसऱ्या भागात काम करणार आहेत. त्या दोघांना या चित्रपटाची स्क्रिप्टही खूप आवडली आहे. आणि या दोघांची केमिस्ट्री पाहता या चित्रपटासाठी यापेक्षा हीट जोडी दिग्दर्शकांना मिळूच शकत नाही. हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र काम करताना आपल्याला दिसतील. "आशिकी'च्या पहिल्या दोन सुपरहिट भागांमुळे तिसऱ्या भागाला योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे. सध्या सिद्धार्थ "इत्तेफाक'च्या रिमेकमध्ये काम करतो आहे; तर आलिया "बद्रीनाथ की दुल्हनियॉं' हा तिचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही महिने ब्रेक घेण्याच्या विचारात आहे. त्यानंतर बहुतेक हे दोघे "आशिकी 3' साठी काम करायला सुरुवात करतील. सिद्धार्थ आणि आलिया, तुमचे चाहते तुमची ऑन स्क्रिन केमिस्ट्री बघायला आतुर आहेत... 
 

Web Title: alia and sidharth aashiqui