अलियाने पाठवले अमृताला गिफ्ट 

शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकताच अमृता ने ट्विटर वर 100k फॉल्लोवर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. सध्या अमृता खानविलकर मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटा मध्ये आलिया भट सोबत काम करत आहे.

मुंबई : मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकताच अमृताने ट्विटर वर 100k फॉल्लोवर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. सध्या अमृता खानविलकर मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटामध्ये आलिया भटसोबत काम करत आहे. कलाकार एकमेकांना कामानिमित्ताने भेटत असतात, पण अलिया मात्र या सर्वांतून वेगळी आहे. कारण शूटनंतरही तिने आपल्या सहकलाकारांसोबतचे बंध जपले आहेत. म्हणूनच अमृता खानविलकरला तिने आठवणीने एक भेटवस्तू पाठवली.  

चित्रपटाचं शूटिंग नुकतीच झाली असं अमृता खानविलकर ने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृता ची मैत्री अधिक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटवस्तू!  ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या. अमृता हे पाहून अगदी भारावून गेली,

अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे. ज्यात ती म्हणतेय, "आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे,तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे.'राझी' हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे और ये करके आपने उसपे मोहर लगा दी ....   "
 

Web Title: alia bhat sends gift to amrita khanvilkar esakal news