मी गाणार नाही! 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

हॉलीवूड रॉकस्टार जस्टिन बिबरची कॉन्सर्ट भारतात होतेय अन्‌ त्यात आपली "दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा गाणार आहे हे समजल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या... 

वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही त्याबाबत भरभरून बोलले नि काहींनी तिच्यावर टीका केली. इंडस्ट्रीतील काही गायकांना ही गोष्ट खटकली. गायक अरमान मलिक, कैलाश खेर, अमाल मलिक आदींनी त्याला विरोध केला.

सोनाक्षी जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये गायली तर ती भारतातील मोठी गायिका आहे असा चुकीचा संदेश जाईल, असं रोखठोक विधान कैलाश खेरने केलंय.

अमाल मलिकने म्हटलंय की, अभिनेत्यांसारखाच सन्मान गायकांनाही मिळायला हवा आणि त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कॉन्सर्टविषयी काहीबाही ऐकून सोनाक्षीला स्पष्टीकरण करावंच लागलं. ती म्हणते, "मी कॉन्सर्टमध्ये गाणार नाहीये. मी फक्त त्यांच्या संयोजकांशी त्याविषयी बोलणी केली होती; पण मीडियानेच कंडी पिकवली की मी गाणार आहे. त्यानंतरच्या माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी असं काहीही होत नसल्याचा खुलासाही केलाय. दुसरं म्हणजे मी अभिनेत्री असले तरी मला संगीताची खूप आवड आहे. मला परफॉर्म करायला नि गायला खूप आवडतं. जर कोणाला ही गोष्ट खटकत असेल तर बिबरच्याच भाषेत मी त्यांना सांगू झच्छिते की, "दे कॅन लव्ह देमसेल्फ. ओव्हर ऍण्ड आऊट.'