अंक तिसरा Live: उलगडली फोटो स्टुडिओमागची अमर कहाणी; नाट्यरसिकांचा तुफान प्रतिसाद

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
रविवार, 10 सप्टेंबर 2017

ई सकाळने सुरू केलेल्या अंक तिसऱ्या या लाईव्ह चॅट शोचं नाट्यसृष्टीक़डून स्वागत होताना दिसतं. डिजिटल मिडियामध्ये नाटकासाठी नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमाचं अमर फोटो स्टुडिओच्या सर्वच कलाकारांनीही कौतुक केलं. यापूर्वी आॅल द बेस्ट 2, अर्धसत्य, गोष्ट तशी गमतीची या नाटकाचे कलाकार सहभागी झाले होते. यात अमर फोटो स्टुडिओची टीम आज सहभागी झाली. अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिद्धेश पुरकर आणि पूजा ठोंबरे यांनी ही गप्पांची मैफल खुसखुशीत आणि तितकीच अर्थपूर्ण बनवली. 

पुणे : ई सकाळने सुरू केलेल्या अंक तिसऱ्या या लाईव्ह चॅट शोचं नाट्यसृष्टीक़डून स्वागत होताना दिसतं. डिजिटल मिडियामध्ये नाटकासाठी नव्याने सुरू केलेल्या या उपक्रमाचं अमर फोटो स्टुडिओच्या सर्वच कलाकारांनीही कौतुक केलं. यापूर्वी आॅल द बेस्ट 2, अर्धसत्य, गोष्ट तशी गमतीची या नाटकाचे कलाकार सहभागी झाले होते. यात अमर फोटो स्टुडिओची टीम आज सहभागी झाली. अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिद्धेश पुरकर आणि पूजा ठोंबरे यांनी ही गप्पांची मैफल खुसखुशीत आणि तितकीच अर्थपूर्ण बनवली. 

#Live अंक तिसरा: अमर फोटो स्टुडिओ 

ठरल्यानुसार रविवारी पावणे अकराच्या सुमारास सुरू झालेल्या या गप्पा पावणेबारापर्यंत चालल्या. अमर फोटो स्टुडिओला रसिकांचा अमाप लोकाश्रय मिळाला आहेच. मंचावर सादर होणाऱ्या या नाटकाचा तिसरा अंक यावेळी उलगडण्यात आला. यात नाटक सुरू असतानाचे किस्से, सर्वात लक्षात राहिलेला प्रयोग यांसह नाटक सुरू असतानाच्या गमतीजमतीही कलाकारांनी शेअर केल्या. अमेय, सखी, सुव्रत यांना  मोठा फॅनफाॅलोइंग आहे. अशावेळी कलाकार म्हणून या नाटकातला साकारण्यास कठीण असलेला प्रसंग, या नाटकाची आठवण, एकमेकांना आपण कसे सांभाळून घेतो अशा अनेक गोष्टी यावेळी शेअर झाल्या. रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांनीही त्यांनी उत्तरं दिली. 

या चर्चेत पूजा ठोंबरे मात्र काही वेळाने सहभागी झाली. पुण्यात टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या लाईव्ह शोमध्ये सिनेसृष्टीतले काही मान्यवरही आॅनलाईन होते. रविवारची ही सकाळ अमर फोटो स्टुडिओच्या कलाकारांनी आणखी स्मरणीय बनवली. 

अंक तिसराची फ्रेम ठरली आकर्षण

ई सकाळने सुरू केलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच अंक तिसऱा या उपक्रमाची स्पेशल फ्रेम बनवून घेण्यात आली होती. हा लाईव्ह शो झाला तो याच फ्रेममध्ये. या फ्रेमचंही विशेष कौतुक झालं. ई सकाळ राबवत असलेल्या या नानाविध उपक्रमांबद्दल आॅनलाईन प्रेक्षकांनी ई सकाळचं अभिनंदन केलं.