सिनेमांतूनच बोलतो! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सध्या "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमामध्ये बिझी असलेला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खान "दंगल'च्या चीनमधील यशाने भलताच खूश आहे

सध्या "ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमामध्ये बिझी असलेला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खान "दंगल'च्या चीनमधील यशाने भलताच खूश आहे. इतकंच नव्हे; तर त्याचे वेईबो नावाच्या चायनीज सोशल मीडिया साईटवर फॉलोवर्सही वाढू लागलेत. यावर आमीर म्हणाला की, सोशल मीडिया हे चाहत्यांशी संवाद साधण्याचं चांगलं माध्यम आहे. पण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे सोशल मीडियावर ऍक्‍टीव्ह राहू शकत नाही आणि मुळात मला एखाद्या विषयावर पटकन व्यक्त व्हायला आवडत नाही. तसा मी खूप बोलणारा वगैरे नाही. त्यामुळे मला माझ्या सिनेमातूनच प्रेक्षकांशी बोलायला आवडतं आणि हेच माझं माध्यम आहे, माझ्या चाहत्यांशी बोलायचं. यापुढे सोशल मीडियावर माझा वावर मी वाढवेन असं मला वाटत नाही. वेल, आमीरला आपलं काम बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायला आवडतं. त्याच्या दंगल सिनेमाच्या चीनमधील यशाने तेच सिद्ध करून दाखवलंय नाही का?