फिटनेस फ्रिक अमित साध 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

अभिनेता अमित साधला मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपट "सुलतान'साठी खूप प्रशंसा मिळाली. आता या वर्षात त्याच्याकडे खूप प्रोजेक्‍टस्‌ आहेत. राम गोपाल वर्माचा "सरकार 3', "रनिंग शादी डॉट कॉम' आणि तिग्मांशु धुलियाचा आगामी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही तो दिसणार आहे. सध्या तो फिटनेसकडे जास्त लक्ष देतोय. दररोज व्यायामासोबत तो सायकल चालवतो. आगामी चित्रपट "रनिंग शादी डॉट कॉम'चं प्रमोशन आणि एका वेबच्या सीरिजच्या चित्रीकरणात तो बिझी आहे. तिथे जिम करायला वेळ मिळत नाही. म्हणून तो घर ते सेट आणि शूटिंग संपल्यावर सेट ते घर येण्या-जाण्यासाठी दररोज सायकलचा वापर करतो. तसेच अमितला ऍडव्हेंचरची आवड आहे.

अभिनेता अमित साधला मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपट "सुलतान'साठी खूप प्रशंसा मिळाली. आता या वर्षात त्याच्याकडे खूप प्रोजेक्‍टस्‌ आहेत. राम गोपाल वर्माचा "सरकार 3', "रनिंग शादी डॉट कॉम' आणि तिग्मांशु धुलियाचा आगामी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही तो दिसणार आहे. सध्या तो फिटनेसकडे जास्त लक्ष देतोय. दररोज व्यायामासोबत तो सायकल चालवतो. आगामी चित्रपट "रनिंग शादी डॉट कॉम'चं प्रमोशन आणि एका वेबच्या सीरिजच्या चित्रीकरणात तो बिझी आहे. तिथे जिम करायला वेळ मिळत नाही. म्हणून तो घर ते सेट आणि शूटिंग संपल्यावर सेट ते घर येण्या-जाण्यासाठी दररोज सायकलचा वापर करतो. तसेच अमितला ऍडव्हेंचरची आवड आहे. त्यामुळे तो बाईक ट्रीप्स आणि देशभरात टूव्हीलरवर भटकंती करत असतो. 

Web Title: Amit sadh fitness cycling