बिग बींकडून संजय भन्साळीचे कौतुक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या "ब्लॅक' या चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बिग बी यांनी आपल्या ब्लॉकवरून ब्लॅक चित्रपटावेळी घडलेल्या काही गोष्टींना उजाळा दिला. त्यात अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे की, संजयचे काम पाहून मला त्याच्यासोबत काम करण्याची प्रंचड इच्छा होती. जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा मी खूप खूश झालो. त्याच्यासोबत काम करायला मिळणे हेच माझ्यासाठी मानधनासारखे होते, असे सांगत त्यांनी आपण या चित्रपटासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नसल्याचे सांगितले.

अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेल्या "ब्लॅक' या चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बिग बी यांनी आपल्या ब्लॉकवरून ब्लॅक चित्रपटावेळी घडलेल्या काही गोष्टींना उजाळा दिला. त्यात अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे की, संजयचे काम पाहून मला त्याच्यासोबत काम करण्याची प्रंचड इच्छा होती. जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा मी खूप खूश झालो. त्याच्यासोबत काम करायला मिळणे हेच माझ्यासाठी मानधनासारखे होते, असे सांगत त्यांनी आपण या चित्रपटासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नसल्याचे सांगितले. संजय चित्रपटाची संहिता मला वाचून दाखवण्यासाठी नाशिकला आला होता. त्यांनी एका काळ्या नस्तीमधून संहिता वाचायला सुरुवात केली. थोडे वाचून झाल्यावर त्यांनी मला सांगितले की, मी गोष्ट चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही तेव्हा तुम्हीच ही संहिता वाचा आणि ते मुंबईला निघून गेले. संजयची बारीक गोष्टींवर असलेली नजर आणि अभिनयासाठी वातारण निर्मिती करण्याची त्याची कला वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी ब्लॉगवर म्हटले आहे. एका अंध आणि कर्णबधिर मुलीची आणि तिच्या शिक्षकाच्या जीवनावर आधारित "ब्लॅक' या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.  
 

मनोरंजन

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल...

03.57 PM

मुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा...

03.39 PM

मुंबई : सध्या जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 च्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. सध्या अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटली आहे. साहजिकच...

02.33 PM