रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई - 'दक्षिणेतील देव' अशी ओळख म्हणजे रजनीकांत. सुपरस्टार पण तितकेच विनम्र ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत..यांचा आज वाढदिवस.. यानिमित्त ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - 'दक्षिणेतील देव' अशी ओळख म्हणजे रजनीकांत. सुपरस्टार पण तितकेच विनम्र ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत..यांचा आज वाढदिवस.. यानिमित्त ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार रजनीकांत यांच्याबरोबर चित्रपट करत आहे. तेव्हा अशावेळी तुम्ही एखाद्या दिग्गज माणसाच्या सानिध्यात आहात याची जाणीव तुम्हाला होतेच असे म्हणत त्यानी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खानने देखील रजनीकांत यांना उत्तम आयुरारोग्य लाभावे अशी प्रार्थना करत त्याना शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारंनी देखील रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, बॉलिवूडच्या कलाकारांबरोबरच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवरुन रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन (मराठी भाषक) कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे.गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.