अमृता खानविलकर दिसणार धर्मा प्राॅडक्शन्सच्या 'राझी'मध्ये

टीम ई सकाळ
सोमवार, 31 जुलै 2017

अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेरसिकाला नवे नाही. आपल्या नृत्याने व अभिनयाने तिेने आपले असे बळकट स्थान सिनेसृष्टीत निर्माण केले आहे. आता अमृताची वाटचाल हिंदीकडे होऊ लागली आहे. धर्मा प्राॅडक्शन्सच्या राझी या चित्रपटात ती काम करते आहे. टि्वटरवरून तिने ही माहीती चाहत्यांना दिली.

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेरसिकाला नवे नाही. आपल्या नृत्याने व अभिनयाने तिेने आपले असे बळकट स्थान सिनेसृष्टीत निर्माण केले आहे. आता अमृताची वाटचाल हिंदीकडे होऊ लागली आहे. धर्मा प्राॅडक्शन्सच्या राझी या चित्रपटात ती काम करते आहे. टि्वटरवरून तिने ही माहीती चाहत्यांना दिली. 

काही महिन्यांपूर्वी आलेल्या रंगूनमध्येही तिची छोटी पण महत्वाची भूमिका होती. आता धर्मासारख्या मोठ्या बॅनरमध्ये तिला प्रवेश मिळणे हे मराठी मनाला निश्चितच सुखावणारी बाब आहे. सोमवारी या चित्रपटासाठी अमृताने पहिला सीन दिला. त्यानंतर फोटोसह तिने ही माहिती ट्विटरवर दिली. या चित्रपटाबद्दल आणखी माहिती देण्यासाठी मात्र उपलब्ध झाली नाही.