अँजेलिनाचा अलविदा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

अँजेलिना जोली काही महिन्यांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांबच आहे. याचं कारण म्हणजे तिचा ब्रॅड पीटशी झालेला घटस्फोट. या घटस्फोटानंतर तिने तिच्या सहाही मुलांची जबाबदारी तिच्याकडे घेतली. त्यामुळे तिला त्यांचा विशेष सांभाळ करावा लागत आहे.

मॅलिफिसंट या चित्रपटाचा आता दुसरा भाग येऊ घातला आहे. या चित्रपटात अँजेलिनाने मुख्य भूमिका बजावली होती. तिची या चित्रपटात एका मनुष्य पक्षाची भूमिका होती, जिचे पंख नंतर छाटले जातात आणि जो राजा हे करतो त्याच्या मुलीला ती शाप देते आणि नंतर तिच्यावरच एखाद्या आईप्रमाणे निखळ प्रेम करू लागते. या चित्रपटातही ती काम करणार आहे; पण हा तिने या चित्रपटाबरोबरच आपल्या अभिनयाच्या करिअरला अलविदा केला आहे. एक अभिनेत्री म्हणून मॅलिफिसंट 2 हा तिचा शेवटचा चित्रपट असणार आहे. कारण तिला आपल्या सहा मुलांच्या संगोपनासाठी काही वेळ द्यायचा आहे. त्यानंतर ती लेखन आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहे; पण ती अभिनय क्षेत्र सोडणार असल्याचे कळतंय.