अभिनव बिंद्रावरच्या चित्रपटात अनिल-हर्षवर्धन कपूर साकारणार पिता-पुत्र

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 जुलै 2017

आॅलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीत सुवर्णपदक मिळवलेल्या अभिनय बिंद्रावर बनणाऱ्या सिनेमाची तयारी सध्या जोरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात अभिनव बिंद्राची भूमिका हर्षवर्धन कपूर करत असून त्याच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांचे नाव मुक्रर करण्यात आले आहे. 

मुंबई : आॅलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीत सुवर्णपदक मिळवलेल्या अभिनय बिंद्रावर बनणाऱ्या सिनेमाची तयारी सध्या जोरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात अभिनव बिंद्राची भूमिका हर्षवर्धन कपूर करत असून त्याच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांचे नाव मुक्रर करण्यात आले आहे. 

अनिल आणि हर्षवर्धन यांनी एकत्र काम करावे म्हणून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक सतत प्रयत्नशील होते. परंतु, आता हा योग बिंद्रावर बनणाऱ्या सिनेमाने साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमासाठी अनिल कपूर सहनिर्माता म्हणूनही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.