ई सकाळ #Live अंक तिसरा: भरत जाधवने शेअर केले नाटकाचे 'सही' अनुभव

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
रविवार, 17 सप्टेंबर 2017

गेल्या काही दिवसांपासून ई सकाळने नाट्यसृष्टीसाठी, नाट्यरसिकांसाठी सुरू केलेल्या अंक तिसरा या व्यासपीठाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. या रविवारी आपल्या नाटकाचा तिसरा अंक सादर करण्यासाठी आली होती पुन्हा सही रे सहीची टीम. यात होते साक्षात भरत जाधव, जयराज नायर, प्रशांत विचारे, प्रणिता, मनोज, शितल आदी मंडळी. यावेळी भरतने नाटकाचे किस्से सांगितलेच. पण, आपल्यासोबत इतर कलाकारांची असलेली नाटकाची कमिटमेंट, त्याला आलेले अनुभव, रसिकांचं मिळालं प्रेम, अंकुश, केदार, भरत यांचं असलेलं बाॅंडिंग यावर त्याने मोकळेपणाने चर्चा केली. 

पुणे :  गेल्या काही दिवसांपासून ई सकाळने नाट्यसृष्टीसाठी, नाट्यरसिकांसाठी सुरू केलेल्या अंक तिसरा या व्यासपीठाला आता चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. या रविवारी आपल्या नाटकाचा तिसरा अंक सादर करण्यासाठी आली होती पुन्हा सही रे सहीची टीम. यात होते साक्षात भरत जाधव, जयराज नायर, प्रशांत विचारे, प्रणिता, मनोज, शितल आदी मंडळी. यावेळी भरतने नाटकाचे किस्से सांगितलेच. पण, आपल्यासोबत इतर कलाकारांची असलेली नाटकाची कमिटमेंट, त्याला आलेले अनुभव, रसिकांचं मिळालं प्रेम, अंकुश, केदार, भरत यांचं असलेलं बाॅंडिंग यावर त्याने मोकळेपणाने चर्चा केली. 

अंक तिसरा: पुन्हा सही रे सही #Live

आज पुण्यात टिळक स्मारक मंदिरला पुन्हा सही रे सहीचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वी या टीमने अंक तिसराला हजेरी लावली. टिळक रोडवरच्या केक स्टुडिओमध्ये हा अंक रंगला. यावेळी बोलताना भरत म्हणाला, जवळजवळ 16 वर्षं हे नाटक आम्ही करतो आहोत. तरीही नाटकातली 60 टक्के टीम तीच आहे. इतर कलाकार त्याच्या बिझी शेड्युलमुळे बदलत असतात. याा वर्षात सहीचे तीन हजारांवर प्रयोग झाले. पुन्हा पुन्हा प्रयोग करून कंटाळा येत नाही का, यावर बोलताना तो म्हणाला, आजही लोक या नाटकाला गर्दी करतात. खळखळून हसतात. यात पुन्हा पुन्हा नाटक बघणारेही खूप आहेत. त्यांना जर नाटक बघून कंटाळा येत नसेल तर आपण नाटक करून का कंटाळायचं. त्यांच्या प्रतिक्रियांतून मला ऊर्जा मिळते असं भरतने नम्रपणे नमूद केलं. 

अंक तिसरा: पुन्हा सही रे सही #Live

गंमतीदार बाब अशी की या नाटकात गेल्या चार महिन्यांपासून प्रणिता हा अभिनेत्री काम करते आहे. तिनेही हे नाटक पाहिलं नव्हतं. यावर ती म्हणते, मी हे नाटक खरंच पाहिलं नव्हतं. पण इतक्या वर्षात मी हे नाटक का पाहिलं नाही असंच मला वाटू लागलं. भरत सरांसोबत काम करणं हा खरंच विस्मयचकित करणारा अनुभव असतो. भरतच्या वक्तशीरपणाचं, शांत स्वभावाचं आणि पाय जमिनीवर असण्याचं सर्वांनीच कौतुक केलं. भरतसोबत अनेक वर्ष असणारे अभिनेते जयराज नायर यांनीही भरतची  वैशिष्ट्ये सांगितली. 

राज ठाकरे आहेत सहीचे फॅन..

या गप्पांमध्ये राज ठाकरे आणि सही नाटक यांची आठवण भरतने सांगितली. तो म्हणाला राज ठाकरे यांनी हे नाटक पाच वेळा पाहिल्याची माहिती दिली. इतकंच नव्हे, तर त्यांनी हे नाटक रंगमंचाच्या मागील बाजूस उभे राहूनही पाहिलं आहे. त्यावेळी भरत त्यांच्या शेजारून गेलेलंही त्यांना कस लक्षात आलं नव्हतं, याची आठवण ताजी झाली.