अंकिता लोखंडे सेनापती झलकारी बाईंच्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बॉलीवूड पदार्पणाच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूडची "क्वीन' कंगना राणावतचा आगामी चित्रपट "मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मधून अंकिता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

या आधी अंकिताच्या चित्रपटांबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात होते; मात्र आता ती कंगनाच्या सिनेमात दिसणार, हे नक्की. त्याबाबत खुद्द अंकितानेच माहिती दिली. ती म्हणते की, मी "मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटात सेनापती झलकारी बाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. खरे सांगू, या आधी मी कधी झलकारी बाईंबद्दल ऐकलं नव्हतं. कदाचित बऱ्याच जणांना त्यांच्याबद्दल माहिती नसेल. झलकारी बाई भारतातील गौरव केलेल्या शूर महिलांपैकी एक होत्या. त्या राणी लक्ष्मीबाई यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. राणी लक्ष्मीबाईंच्या सेनेतील त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या मार्गदर्शक होत्या. मला त्यांचा रोल साकारायला मिळणार याचा अभिमान आहे...