अनुपम खेर यांचाही हॉलीवूडपट 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी हॉलीवूडपटात झळकलेत. त्यात आता फारसं अप्रूप राहिलेलं नाही. हॉलीवूडपटात महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणं महत्त्वाचं. बॉलीवूडचे अनेक स्टार सध्या हॉलीवूडपट करताहेत. अनुपम खेर त्यातलंच एक नाव.

त्यांचा "द बिग सीक' हा हॉलीवूडपट सध्या अमेरिकेत फार गाजतोय. मायकल शोआल्टर त्याचा दिग्दर्शक आहे. 30 जुलैला तो भारतात रिलीज होईल. सिनेमाची कथा आहे, एका पाकिस्तानी मुस्लिम तरुणाची. ज्याला स्टॅण्डअप कॉमेडिअन व्हायचं असतं. तो अमेरिकेत शिकत असतो. तिथेच एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडतो; पण त्याच्या धर्म आणि संस्कृतीनुसार त्याच्या घरच्यांना त्यांचं नातं मान्य नसतं.

त्याची प्रेयसी एमिली हिला एक गंभीर आजार होतो. तेव्हा तो तिच्या घरच्यांची आणि तिची जबाबदारी घेतो... सिनेमाची कथा कुमेल नांनजिआनीने लिहिली आहे. त्याच्या स्वतःच्या आयुष्यावर ती बेतलीय. अनुपम खेर अझमतची भूमिका करताहेत. त्यांचा हा 500 वा चित्रपट आहे. चित्रपटात कुमेल नांनजिआनी, झुई कॅझन, शेहनाझ ट्रेझरी, रे रोमॅनो, बो बर्नहॅम, ऍडी ब्रायंट आदी कलाकारांनी काम केलंय.