अनुष्काचे नवे अभियान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे याआधी अमिताभ बच्चन यांना या अभियानासाठी निवडले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या अभियानाचा फिमेल फेस म्हणून काम करणार आहे. अनुष्का मुख्यतः तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तरुणींच्या स्वच्छतेबाबतच्या समस्या खूप असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा नवीन चेहरा आहे अनुष्का शर्मा. कोणत्याही सरकारी जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी असेल तर ती जाहिरात किंवा ते अभियान जास्त यशस्वी होते, अशी धारणा आहे. कारण आपल्या देशात सेलिब्रिटी हे भारतातील छोट्यातला छोट्या गावात पोहोचलेले आहेत. त्यामुळे याआधी अमिताभ बच्चन यांना या अभियानासाठी निवडले होते. त्यानंतर आता अनुष्का शर्माही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर या अभियानाचा फिमेल फेस म्हणून काम करणार आहे. अनुष्का मुख्यतः तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तरुणींच्या स्वच्छतेबाबतच्या समस्या खूप असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. म्हणून अनुष्का आता या अभियानात खास महिलांच्या प्रश्‍नांवर काम करणार आहे. या आधी स्वच्छतागृहांच्या अभियानासाठी विद्या बालनने काम केले होते. अनुष्काचे हे नवे अभियान यशस्वी होण्यासाठी तिला शुभेच्छा. 

Web Title: Anushka in swachata abhiyan